२७ जून शिवदिनविशेष !! 27 June ShivDinvishesh
२७ जून इ.स.१६७०
कोकणातील रायगड जिल्ह्यातील "कुर्डूगड उर्फ मंदारगड" मराठ्यांनी जिंकला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳२७ जून इ.स.१६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"मराठ्यांनी पळवून लावलेल्या मुघल सरदार शेरखानाच्या ठिकाण्यावर छापा घालून मराठ्यांनी जड-जवाहीर, किंमती वस्तू, दागिने आदी मोठा ऐवज स्वराज्यात आणला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳२७ जून इ.स.१६८०
छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या तृतीय पत्नी सकलसौभाग्यसंपन्न "पुतळाबाई राणीसाहेब" सती गेल्या.(सत्यता पडताळून घ्यावी)
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
२७ जून इ.स.१७०८
सेनापती धनाजी जाधव यांची पुण्यतिथि (जन्म : १६५०)शिवकाळामध्ये धनाजी जाधव यांनी सेनापती प्रतापराव गुजर आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पराक्रम केला.यामध्ये उंबरखिंडीची लढाई (१६६१), उमराणीचे युध्द (१६७२), नेसरीचे युद्ध (१६७४), कोपल बहादुरविंडा तसेच सावनूरची लढाई अशा अनेक मोहिमांमध्ये धनजीरावांनी पराक्रमाची शर्त केली आणि स्वतःची मुद्रा (शिक्का) तयार करून शिवचरणी तत्पर 'धनजी जाधव किंकर' असा बहुमान प्राप्त केला. या मुद्रेमध्ये त्यांनी स्वतःला किंकर म्हणजेच सेवक अगर चाकर असे म्हटले आहे.छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतरच्या प्रतिकूल काळात स्वराज्याचे रक्षण करणारे सेनापती म्हणून धनाजी जाधव यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या सेनापतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी समकालीन संदर्भातून धनाजी जाधव यांनी अतुलनीय कामगिरी करत सेनापतीपद सांभाळले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 27, 1670
"Kurdugad aka Mandargad" in Raigad district of Konkan was won by the Marathas.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
June 27, 1677
"Dakshin Digvijay Mohim"
By raiding the place of Mughal Sardar Sherkhana, which was kidnapped by the Marathas, the Marathas brought a large quantity of jewels, valuables, jewelery etc. to the Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
June 27, 1680
After the death of Chhatrapati Shivaji, his third wife "Putlabai Ranisaheb" Sati passed away.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
June 27, 1708
Death of General Dhanaji Jadhav (Born: 1650)
During the Shiva period, Dhanaji Jadhav performed special feats under the leadership of Senapati Prataprao Gujar and Senapati Hambirrao Mohite.
In many battles such as Battle of Umbarkhindi (1661), Battle of Umrani (1672), Battle of Nesari (1674), Battle of Kopal Bahadurvinda and Battle of Savnur, . In this posture, he calls himself Kinkar, meaning servant.
Chhatrapati Sambhaji Maharaj and Dhanaji Jadhav are mentioned as the generals who defended the Swarajya during the adverse times after him. Although many questions were raised about his commander-in-chief, Dhanaji Jadhav performed incomparably in the contemporary context.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments