२५ मे शिवदिनविशेष !! 25 May ShivDinvishesh
२५ मे इ.स.१६६२
शाईस्तेखानाचे दोन सरदार सरफराज खान व नामदार खान या दोघांनी नेताजी पालकरांचा सुप्याजवळील लढाईत पराभव केला व अल्पशी लूट मिळवली.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩२५ मे इ.स.१६६६
महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले असताना एके दिवशी एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले. अन् म्हणाले, ' महाराज , हे पाहा काय! ' महाराज अन् सर्वचजण उठले, दाराकडे धावले. बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे दोन हजार मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद! महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा. बेड्या नव्हत्या हातात. पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळीले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणांत मृत्युच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली. महाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशे मावळ्यांच्या मराठी छावणीलाही सैनिकांचा गराडा होता. महाराज, शेजारीच असलेल्या रामसिंगच्या निवासस्थानी या कैदेतुनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्या भेटीगाठी किंवा ( गुप्त राजकीय कामेधामे ) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेMay 25, 1662
Sarfaraz Khan and Namdar Khan, two chiefs of Shaistekhana, defeated Netaji Palkar in a battle near Supya and looted a little.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
May 25, 1666
One day while Maharaj was visiting Agra to meet Aurangzeb, a terrible thing happened. While Maharaj was talking to some of his Marathas in his shamiana, the Mavale guards at the door of the shamiana suddenly ran towards Maharaj. Ann said, 'Sir, look at this! Maharaj and everyone got up and ran to the door. Looking outside, he was guarding the camp of hundreds of Mughal soldiers and their chief Kotwal Siddi Fouladkhan Maharaj. There must have been about two thousand Mughals. Marathi Chimukali camp was being demolished. Imprisonment! Maharaj was being confined in this garrison. Aurangzeb had openly imprisoned the Maharaja. It was not a prison. There were no handcuffs. But it was a strict imprisonment. Maharaj was shocked. They saw the future. The first impulse was unleashed. He hugged Shambhu Raja to his stomach. Overall we were convinced that we were stuck in the jaws of death in these Agra cases. Maharaj's gaze began to capture. The Marathi camp of 300 Mavals also had a garrison of soldiers. Maharaj was also passing by this prisoner at Ramsingh's residence next door. Fuladkhan was also on guard. That is, it was not possible to escape. Maharaj was getting anxious. Ramsingh was sad and helpless. Moreover, the words of the Rajput were waving the leaves of Tulsibela of Maharaj's safety on his head. Every single moment was getting heavier day by day. Maharaj's two lawyers, however, could go outside the camp to meet anyone or for (secret political activities). As a lawyer, he was free. Raghunath Ballal Korde and Trimbak Sondev Dabir are the lawyers.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments