Ticker

6/recent/ticker-posts

२४ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 24 February ShivDinvishesh

२४ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 24 February ShivDinvishesh


२४ फेब्रुवारी इ.स.१६६५

छत्रपती शिवरायांनी कारवार जिंकून कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.ते जाता जाता म्हणाले, "आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली!"🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२४ फ़ेब्रुवारी इ.स.१६७०

"किल्ले राजगड" येथे छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी "रामराजे उर्फ राजाराम" यांचा जन्म . पुत्र पालथा जन्मल्यामुळे अतिविद्वान धर्मपंडीतांनी शुभ-अशुभ चर्चा करायला सुरूवात केली. पण शिवराय म्हणाले, "पुत्र पालथा जन्माला आला, चांगले झाले. तो दिल्लीची पातशाही सुद्धा पालथी घालील". आणि पुढे १६८९ मध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२४ फेब्रुवारी इ.स.१६७४

"महाशिवरात्र"सरसेनैपती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर पुण्यतिथी"मराठ्यांच्या गनिमी काव्याने स्वराज्यावर चालून आलेला बेहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मराठ्यांना शरण आला. आता शरण आलेल्याला मारू नये असा धर्म सांगतो, त्यामुळे "सरसेनापती प्रतापराव गुजर" या तत्वनिष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली व तो गनीम जिव वाचवून गेला. पण नंतर दगाबाज बेहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणाऱ्या बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांची पत्र पाठवून कानऊघडणी केली, "बहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. तोच सल मस्तकात घेऊन "सरनोबत प्रतापराव गुजर" जगत होते. महाशिवरात्रीचा दिवस उगवला, प्रतापराव गुजर हे त्यांच्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बेहलोल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राजाभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतींचा मुजरा झडणार नव्हता, कारण "बेहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका", असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता. बेहलोलखानाचं नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या, विजेच्या चपळाईने प्रतापरावांनी घोड्याला टाच मारली आणि ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले.फक्त सात, हो फक्त सातच वीर.अन अचानक प्रतापराव बेहलोल खानावर तुटून पडले. त्यांच्यासोबत होते,विसाजी बल्लाळ,दीपोजी राउतराव,विट्ठल पिलाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल,विठोजी शिंदे.या आपल्या ६ जणांनी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली.नेसरी खिंडीचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले.याच युद्धाचे वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात,"म्यानातून उसळे तलवारीची पात,वेडात मराठे वीर दौडले सात".🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२४ फेब्रुवारी इ.स.१८१२

पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


February 24, 1665

Chhatrapati Shivaji won the caravan and left the caravan. But his desire to plunder the British remained unfulfilled.
As they were leaving, they said, "Our Holi hunting was spent by Sherkhana!"
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 24, 1670

"Ramraje alias Rajaram" was born at "Fort Rajgad" to Chhatrapati Shivaji's second queen Soyarabai. With the birth of his son Paltha, the learned scholars started discussing auspicious and inauspicious matters. But Shivrai said, "Son Paltha was born, he got better. He will also wear Palthashi of Delhi." And later in 1689, after the assassination of Chhatrapati Sambhaji Raje, Rajaram Maharaj became the 3rd Chhatrapati of the Marathas.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 24, 1674

"Mahashivaratra"
Sarsenapati Kudtoji alias Prataprao Gujar Punyatithi "
Behlolkhan Jeris, who had marched on the Swarajya with the guerrilla poetry of the Marathas, came. Seeing the time, he surrendered to the Marathas. Now the religion says not to kill the refugee, so the principled Maratha "Sarsenapati Prataprao Gujar" converted him and saved his life. But then the swindler Behlolkhan came back to Swarajya and sent a letter to Prataprao about the release of Bahlolkhan who was harassing the ryots. Gujar had gone out with his six stonemasons for a leisurely walk. While he was far away from the main camp, he heard the news that Behlol Khan was marching on Swarajya with a large army. It was not going to happen, because the Behlol Khanas were commanded by the Maharaja not to show their faces to Raigadi without getting crowded. Susat ran back.
Only seven, yes only seven heroes.
Suddenly Prataprao Behlol collapsed on the food. Was with them,
Visaji Ballal,
Dipoji Rautrao,
Vitthal Pilaji Atre,
Krishnaji Bhaskar,
Siddi Hilal,
Vithoji Shinde.
These 6 of us sacrificed our lives. Another gap in the Swarajya was sanctified.
Nesari Pass was converted into a pilgrimage site.
Describing this war, McCarthy says,
"The scabbard swings from its sheath
Seven mad Maratha heroes ran ".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 24, 1812

A big fire broke out in ShanivarWada Pune.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments