२२ मार्च शिवदिनविशेष !! 22 March ShivDinvishesh
२२ मार्च इ.स.१६८२
औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. स्वराज्याच्या इतर किल्ल्यांसारखा हा किल्ला काही उंच किंवा जिंकण्यास अवघड नव्हता. स्वराज्याच्या उत्तर सीमेवरील हा किल्ला, अवघे ५००-६०० मराठे पुढची थोड़ीथोडकी नव्हे तर तब्बल ६ वर्षे लढ़विणार होते. मराठ्यांच्या आणि त्यांच्या किल्लेदाराच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳२२ मार्च इ.स.१६६०
छत्रपती शिवराय पन्हाळा वेढ्यात असताना याच वेळी केदारजी खोपडे देसाई व ईतर देशमुखांना आदीलशहाने आदीलशाहीस मदत करन्याचे पत्र पाठवले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳२२ मार्च इ.स.१६८०
शिवराय ज्वराच्या व्यथेने आजारी पडलेमहाराज दक्षिण दिग्विजय प्राप्त करून रायगडी परत आले होते.रामराजांचा व्रतबंध व विवाह पार पडला होता .सूर्यग्रहणाचे पर्व आटोपले होते .दोनच दिवसांनी महाराज रायगडी ज्वराच्या(तापेच्या) व्यथेने आजारी पडले .आजार बळावत चालला होता .🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳२२ मार्च इ.स.१७५५
इंग्रज आणि पेशवे यांच्यात तह झाला.या तहानुसार इंग्रज नौदल हे मराठा आरमारावर स्वारी करण्यासाठी निघाले.म्हणजेच स्वराज्याचे सागरी आरमारप्रमुख 'तुळाजी आंग्रे' असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी स्वता बांधून घेतलेल्या 'किल्ले सुवर्णदुर्ग' वर स्वारी करण्यासाठी निघाले.आरमारप्रमुख 'तुळाजी आंग्रे' जुमानत नाही म्हणून मगरूर आणि उन्मत्त झालेले पेशवेच आपल्या स्वराज्याच्या सागरी आरमाराच्या जिवावर उठले होते.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेMarch 22, 1682
Emperor Aurangzeb reached Aurangabad and without wasting any time, started planning a battle. He had taken all the battlefields into his own hands. The emperor thought that the Mughal army would capture this part of the Marathas in a very short period of time and so he decided to take the forts of the Marathas first. Unlike other forts of the Swarajya, this fort was not high or difficult to conquer. This fort on the northern border of the Swarajya, only 500-600 Marathas were going to fight for the next 6 years, not just a little bit. He himself was not at all aware of this unique feat done by the Marathas and their fort keepers. Nusatya Ramses fought this Mughal army for more than half a decade, capturing the capitals of Rajputs, Sikhs, Nizamshahis, Adilshahis, Qutubshahis and many more.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
March 22, 1660
While Chhatrapati Shivaji was besieging Panhala, Adilshah sent a letter to Kedarji Khopde Desai and other Deshmukhs to help Adilshahi.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
March 22, 1680
Shivrai fell ill with fever
Maharaj had returned to Raigad after achieving Dakshin Digvijaya. Ramraj's vows and marriage were over.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
March 22, 1755
A treaty was made between the British and the Peshwa.
According to this treaty, the British navy set out to invade the Maratha fleet.
That is to say, he set out to invade the 'Fort Suvarnadurg' built by Tulaji Angre, the Chief of Naval Armory of the Swarajya, and built by Chhatrapati Shivaji himself.
The arrogant and arrogant Peshwa was the one who risked the life of the naval armor of his Swarajya as Tulaji Angre, the head of the armor, did not like it.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments