Ticker

6/recent/ticker-posts

१२ जुलै शिवदिनविशेष !! 12 July ShivDinvishesh

१२ जुलै शिवदिनविशेष !! 12 July ShivDinvishesh

१२ जुलै शिवदिनविशेष !! 12 July ShivDinvishesh

१२ जुलै १६६०

पन्हाळगडच्या वेढ्यातून पलायन महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता. महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. बाजीप्रभू निघाले. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले बनले होते. झाडाझुडपातूंन अन् खोगळ्यांतून महाराजांची पालखी धावत होती.पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लखाकत होत्या. पालखी धावत होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली.वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला ! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ? त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा एक जवान बसला. ती पालखी घेऊन १५ - २० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले. आणि महाराजांची पालखी बाजी प्रभुंनी एकदम आडमार्गाने विशाळगडाकडे न्यायला सुरूवात केली.शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. एकदम त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले की, आत कोण आहे ? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर मान खाली घालून उभे राहिले. पण जाणकारांनी ओळखले ! काही गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले - की हा तर शिवा न्हावी आहे. ताबडतोब स्वराज्याच्या त्या शिलेदारांची गर्दन उडाली.पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला. नुसताच मनस्ताप - पश्चात्ताप - चिडचिड आणि वडवड. घोड्याला टाच मारून आवघे एल्गारत निघाले...वाटेतील गुढगा - गुढगा चिख्खल तुडवीत.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१२ जुलै १६६०

पावनखिंड – आषाढ शुद्ध पौर्णिमा , गुरुपोर्णिमा बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली " पावनखिंड ". जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुधा ओशाळविले जीवन . बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.
पावनखिंडीचा लढासिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१२ जुलै इ.स.१६५९

स्वराज्यावर चालून आलेला "अफझलखान" हा मलवडीहून "वाई" येथे दाखल झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩

१२ जुलै इ.स.१६६०

छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा वरून विशाळगडाकडे निघाले.
"सिद्दी मसूद" हा पाठलागावर निघाला आणि महाराजांसोबत होते "हिरडस मावळ" मधील "बांदल सेना".
त्या बांदल सेनेचे नेतृत्व करत होते "बाजी बांदल" आणि "रायाजी बांदल".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१२ जुलै इ.स.१६७७

#दक्षिण_दिग्विजय_मोहीम
छत्रपती शिवराय तिरूमलवाडीत मुक्कामी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

July 12, 1660


Maharaj escaped from the siege of Panhalgad and left Panhalgad. It was about ten o'clock at night. It was the night of the Ashadi full moon. (July 12, 1660) But the moon disappeared behind the black clouds. Maharaj was sitting in a palanquin. The palanquin was lifted by the Mavals. Bajiprabhu left. 600 Mavals also left. And an empty palanquin. Rain, storms, lightning continued unabated. The palanquin was descending slightly down the fort. The spies were on their way to show the way. Siddi Jauhar's camp was completely oblivious. Shivaji will surrender tomorrow! So why stand on the front in this stormy rain? Relax warmly! The royal front had become lax with such careless thinking. Maharaj's palanquin was running through the bushes. It was raining. The sky was thundering. The canopy was throbbing. The lightning was flashing. The palanquin was running. The eyes were trembling with fear. The palanquin passed through the siege unknowingly through the sandispati of the camp. The palanquin went far away from the siege. This is what happened! Jauhar's spies recognized the palanquin. Now? In that empty palanquin sat a young man who now looked like a maharaja. Taking that palanquin, 15-20 people started running on the main road. And Maharaj's palanquin Baji Prabhu started to take him to Vishalgad by a detour. The pursuit of the enemy was inevitable. In fact, Jauhar's army followed Siddi Masaud. Suddenly, they slammed into the palanquin. He asked the Mavals, who is inside? The answer is that Shivaji is the king in the palanquin. Maharaj was captured with a palanquin and entered the camp of Ansiddi. He stood in front of Siddi with his neck down. But the experts recognized! There is something wrong. Inquired. I realized that this is Shiva's bath. Immediately the necks of those Shiladars of Swarajya were blown off. Again Siddi Masood went in pursuit. Just heartache - remorse - irritability and resentment. Avaghe kicked the horse and set off in Elgar ... Gudga - Gudga trampled the mud on the way.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

July 12, 1660


Pavankhind - Ashadh Shuddha Pournima, Gurupournima "Pavankhind" sanctified by the blood of Bajiprabhu. Where Bajiprabhu placed the body. Prabhu Deshpande was a descendant of Deshkulkarni from Hirdas Mavla in Bhor taluka of Pune district. Banda Diwans were the bandits who opposed Shivaji Raja. But seeing Baji's administrative skills and bravery, Chhatrapati Shivaji Maharaj adopted this all-round personality. Baji also dedicated his allegiance to Shivaji Raja for Swarajya.
Battle of Pavankhindi Joji had taken Maharaj to Baji Vishalgad to escape the siege of Panhala. At that time, realizing that he had been betrayed, the Bijapuri army was chasing him. Realizing the danger ahead, Baji asked Maharaj to proceed to Vishalgad. The two brothers, Baji and Fulaji, stood in the gorge of Gajapur (Ghodkhindi) as a great time for the army of achievement. Thousands of troops were stopped by 300 Marathi Mavals. Despite walking for 21 hours in a state of exhaustion, Baji and his family fought valiantly for 6 to 7 hours.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

July 12, 1659

The "Afzal Khan" who marched on the Swarajya arrived at "Wai" from Malwadi.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩

July 12, 1660

Chhatrapati Shivaji's fort started from Panhala to Vishalgad.
"Siddi Masood" went in pursuit and was accompanied by "Bandal Sena" from "Hirdus Maval".
That Bandal Sena was led by "Baji Bandal" and "Rayaji Bandal".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

July 12, 1677

#Dakshin_digvijay_mohim
Chhatrapati Shivaji stays at Tirumalwadi.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments