Ticker

6/recent/ticker-posts

११ जून शिवदिनविशेष !! 11 June ShivDinvishesh

११ जून शिवदिनविशेष !! 11 June ShivDinvishesh

११ जून शिवदिनविशेष !! 11 June ShivDinvishesh

११ जून इ.स.१६६५

"छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह" इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजीमहाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन इ.स.१६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे इ.स.१६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 
११ जून इ.स.१६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻या तहान्वये महाराजांनी आग्राला भेट देण्याचे तसेच दक्षिणेकडील मुघलांना मदत करण्याचे मान्य केले व चार लाख होणचा प्रदेश व २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,१. अंकोला २. कर्नाळा ३. कोंढाणा (सिंहगड) ४ कोहोज ५. खिरदुर्ग (सागरगड) ६. तिकोना ७. तुंग ८. नंगगड ९. नरदुर्ग १०. पळसगड ११. किल्ले पुरंदर १२. प्रबळगड - मुरंजन १३. भंडारगड १४. मनरंजन १५. मानगड १६. मार्गगड १७. माहुलीगड १८. रुद्रमाळ १९. रोहिडा २०. लोहगड २१. वसंतगड २२. विसापूर २३. सोनगड🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून इ.स.१६७४

 शिवाजी महाराजांनी राजाभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ओक्सेद्रनला भेटण्याची परवानगी दिली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


June 11, 1665

The famous "Treaty of Purandar" between "Chhatrapati Shivaji Maharaj" and "Mirza Raje Jaisingh" In 1649, Adilshah imprisoned Shahaji Raja. At the same time, Shivaji Maharaj captured many Adilshahi forts. So Adilshah sent him to Fateh Khan to take care of Shivaji. The situation was very difficult for Shivaji Maharaj. On the one hand, his father Shahaji Raje was in captivity and on the other hand, the invasion of Fateh Khan would endanger the Swarajya. The Maharaja chose the site of Purandar fort for battle at this time. But this time the fort was not in the possession of the Marathas. The fort was in the possession of Mahadji Nilkanthrao. Taking advantage of the quarrel between their brothers, the Maharaja succeeded in entering the fort. With the help of this Purandar fort, the Marathas fought against Fateh Khan and won the battle. Shivaji Maharaj achieved great success in this first battle. In the year 1655, Shivaji Raja appointed Netaji Palkar as the head of the fort. Vaishakh Shu. Sambhaji Raja was born on Thursday, May 14, 1657. In 1587, i.e. 1665, the Mughal chief Jayasinghe laid siege to Purandar fort.
Khan captured Vajragad and attacked Purandar and captured Purandar Machi. There was a fierce battle between Khan and Murarbaji. Murarbaji fell and at the same time Purandar also fell. When the kings came to know about this present, they started talking to Jayasinghe about it and on June 11, 1665, the famous 'Treaty of Purandar' was signed.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
In this Tahanvaye Maharaj agreed to visit Agra and help the Mughals in the south and had to give a territory of four lakhs and 23 forts to the Mughals. Their names are
1. Ankola 2. Karnala 3. Kondhana (Sinhagad) 4 Kohoj 5. Khirdurg (Sagargad) 6. Triangle 7. Tung 8. Nanggad 9. Nardurg 10. Palasgad 11. Fort Purandar 12. Prabalgad - Muranjan 13. Bhandargad 14. Entertainment 15. Mangad 16. Marggad 17. Mahuligad 18. Rudramal 19. Rohida 20. Lohgad 21. Vasantgad 22. Visapur 23. Songad
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 11, 1674

She was allowed by Shivaji Maharaj to meet English lawyer Henry Oxedron 5 days after his coronation.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments