स्वीट्स (गोडाचे पदार्थ) Sweets
थंडीच्या दिवसात, दिवाळीत किंवा एखाद्या छोट्याश्या प्रसंगावेळी आपल्याला गोड पदार्थ हे जेवणात असायलाच हवेत. हे लाडू ,चिक्की आपल्याला अस वाटतं की घरी बनवणे म्हणजे महासंकट, परंतु आज सोप्पी पद्धत आणि पाककृती म्हणजेच रेसिपी जाणून घेऊयात....
पौष्टिक लाडू
साहित्यः
एक वाटी शेंगदाणे ,पाव वाटी खजूर ,पाऊण वाटी गूळ,
कृती :
शेंगदाणे भाजून त्याचे बारीक कूट करा . या कुटामध्ये किसलेला गूळ व खजुराचे छोटे तुकडे टाका . मिश्रण एकत्र करा . याला गरम करावे लागत नाही . यानंतर मिश्रणाचे छोट - छोटे लाडू बनवा . पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार होतात . हीच कृती वापरून आपण खजूर व शेंगदाण्याऐवजी नाचणी , गहू बेसन , मुगाच्या डाळीचा रवा वापरून पौष्टिक लाडू बनवू शकतो .
नाचणी पीठ लाडू
साहित्यः
दोन वाट्या नाचणी पीठ, एक वाटी मूगडाळ रवा ,अडीच वाटी गूळ, एक वाटी तूप
कृती :
नाचणीचे पीठ व मूगडाळ रवा थोड्या तुपावर कढईत भाजून घ्या व बाजूला ठेवा . उरलेले तूप वितळेपर्यंत गरम करून त्यात गूळ बारीक करून घाला व चांगला विरघळून घ्या . त्यात नाचणीचे पीठ व मूगडाळ रवा घालून मिश्रण चांगले एकत्र करा व त्याचे लगेच लाडू वळा .
गहू - बेसन लाडू
साहित्यः
दोन वाट्या गहू ,अर्धी वाटी हरभरा डाळ ,अर्धी वाटी मूगडाळ, अडीच वाट्या गूळ ,एक वाटी तूप .
कृती :
गहू व डाळी मंद आचेवर ताबूस रंगावर वेगवेगळया भाजून घ्या . गार झाल्यावर सर्व एकत्र करून रवाळ पीठ काढून आणा . कढईत तूप वितळेपर्यंत गरम करा . त्यात गूळ बारीक करून टाका व चांगला विरघळवून घ्या.त्यात पीठ घालून हे मिश्रण चांगले एकत्र करा व त्याचे लगेच लाडू वळा .
आळिवाचे लाडू
साहित्यः
पाऊण वाटी आळीव, एक खरवडलेला ओला नारळ, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, एक छोटा चमचा वेलदोड्याची पूड.
कृती :
नारळाच्या पाण्यात आळीव भिजवून तीन - चार तास ठेवा . आळीव भिजून चांगले मऊ झाले पाहिजेत . नारळाचे पाणी कमी पडल्यास थोडे साधे पाणी शिंपडा.माड बुडाच्या पातेल्यात नारळ , आळीव , गूळ घालून मंद आचेवर शिजवा . मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलदोड्याची पूड मिसळून बामूला काढून ठेवा . थंड झाल्यावर लाडू बांधा .
गूळ पापडी
साहित्यः
एक वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी गूळ, एक छोटा चमचा खसखस ,पाव चमचा इलायची पावडर, एक चमचा किसलेले खोबरे, अर्धी वाटी तूप .
कृती :
प्रथम खसखस थोडे तूप लावलेल्या एका ताटावर सारख्या प्रमाणात पसरवून ठेवा . हे ताट बाजूला ठेवा . नंतर एका कढईत तूप टाकून त्यावर गव्हाचे पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्या . कढई गॅसवरून खाली काढा व त्यामध्ये किसलेला गूळ , विलायची पावडर व खोबरे घालून मिश्रण चांगले एकत्र मिसळा . गूळ वितळल्यावर व मिश्रण गरम असतानाच खसखस टाकलेल्या ताटामध्ये मिश्रण ओता व सगळीकडे सारखे करा . गरम असतानाचा त्यांचे हव्या त्या आकाराचे तुकडे करा . थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा . या वड्या १० ते १५ दिवस खराब होत नाहीत .
तिळाची चिक्की
साहित्यः
अर्धी वाटी तीळ ,पाव वाटी गूळ, दीड चमचा तूप .
कृती :
तीळ लालसर होईपर्यंत भाजा . गार करण्यासाठी बाजूला ठेवा . एका थाळीला तळाला तूप लावून ती बामूला कढईत तूप घेऊन ते गरम करा व त्यात गूळ मिसळा . मंद गॅसवर मिश्रण हलवत रहा.थंड पाण्यामध्ये या मिश्रणाचा एक थेंब टाकल्यावर त्याची घट्ट गोळी बनेल तोपर्यंत मिश्रण गॅसवर ठेवा . यानंतर त्यात भाजलेले तीळ गुळाच्या गोळ्यामध्ये मिसळून पुन्हा गॅसवर तापवा . हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत घालून पातळ थापा . गार झाल्यावर वड्या पाडा .
आळिवाची खीर
साहित्यः
अर्धी वाटी आळीवाचे दाणे ,दोन वाट्या दूध, एक छोटा चमचा सुंठ पावडर सहा छोटे चमचे साखर.
कृती :
आळीवाचे दाणे एक वाटी दुधात किंवा पाण्यात भिजवा . ते भिमून फुगल्यावर त्यात दूध , साखर , सुंठ पावडर घालून एकत्र करा व गॅसवर ठेवून एक उकळी आणा , खीर तयार होईल .
बाजरीच्या कापण्या
साहित्यः
एक वाटी बाजरीचे पीठ ,अर्धी वाटी किंवा आवडीप्रमाणे गूळ, दोन छोटे चमचे तीळ, तळण्यासाठी तेल .
कृती :
बाजरीचे पीठ आणि तीळ एकत्र करा . नंतर गूळ थोड्या पाण्यात विरघळवा व त्या पाण्यात बाजरीचे पीठ व तीळाचे मिश्रण भिजवून ते चांगले मळा . मळलेले पीठ लाटून त्यांचे चौकोनी तुकडे करा व गरम तेलात तांबूस होईपर्यंत तळा .
आळिवाच्या वड्या
गूळ , नारळ घातलेल्या आळिवाच्या वड्या अतिशय चविष्ट लागतात .साहित्यः
एक वाटी आळिवाचे दाणे, एक वाटी गूळ, एक वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी भाजलेली खसखस ,एक चमचा तूप ,अर्धा छोटा चमचा वेलची पूड, अर्धा छोटा चमचा मायफळ पूड ,एक वाटी दूध .
कृती :
आळिवाचे दाणे थोड्या तुपावर परता व दुधात भिजत घाला.आळिवाचे दाणे भिजल्यावर त्यात गूळ , खोबरे , खसखस घालून मंद आचेवर ठेवून घाटा . घट्ट झाल्यावर त्यात वेलची , मायफळ पावडर घालून ताटात थापा.थंड झाल्यावर वड्या पाडा . .
लापशी
साहित्यः
अर्धी वाटी गव्हाची भरड ,( जाड दळलेला गहू ) अर्धी वाटी साखर किंवा किसलेला गूळ, अर्धा छोटा चमचा वेलदोडा पावडर, तीन मोठे चमचे गरम दूध ,तीन मोठे चमचे तेल किंवा उपलब्ध असल्यास तूप.
कृती :
कढईत तेल तापवून त्यात गव्हाची भरड तांबूस होईपर्यंत भाजा . त्याचवेळी दीड वाटी पाणी दुसऱ्या भांड्यात तापवा . पाणी तापल्यावर ते गव्हाच्या भरडीमध्ये घाला . मिश्रण उकळवा . गव्हाची भरड शिमू द्या . नंतर त्यात साखर , वेलदोडा पावडर मिसळवा . मंद आचेवर मिश्रण तापवा . ते थंड होऊ द्या . खायला देण्याआधी दूध मिसळून लापशी पुन्हा गरम करा .
0 Comments