खानदेशी डाळ बट्टी (Dal-Batti)
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकरअरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाहीराउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही
खानदेश म्हणाल की हि कविता कोणाला आठवणार नाही? या कवितेच्या कवयित्री बहिनाबाई चौधरी आणि त्यांची लेखणी काळजाचा घाव का नाही घेणार, खानदेशातील अक्षय त्रितियेचा मोठा सण त्याच प्रमाणे नवरात्रिची धामधूम ,कानबाईचा एक अनोखा सण आणि आजुन बरेच विविध सण. खानदेशी लोक प्रेमळ मायाळू अणि खाण्याच्या बपतित चोखंदळ आणि स्वयंपाकात एकदमच पटाईत.....
आज आपण बघुयात एकदम फ़ेमस असा खानदेशी पदार्थ....डाळ बट्टी! बनवायला थोडासा किचकट वाटेलही सुरवातीला पन तितका कठिण नाही आणि खायला एकदम मस्तच....
खानदेशातील अट्रावल इथे मंजौबाची मोठी जत्रा असते तिथ सर्व भाविक येतात व मंदिर परिसरात दळ बाटटीचा नैवद्य बनवता. आणि मंजौबाला हा नैवद्य दाखवून तिथेच प्रसादाचा आस्वाद घेतात.
चला तर बघू नेमकी कशी बनवता ही डाळ बट्टी,
साहित्य-
अर्धा किलो गहू,मिठ चविनुसार,ओवा 2 चमचे, पाव चमचा हिंग,हळद अर्धा चमचा,खाण्याचा सोडा पाव चमचा,तुप 1 वाटी
कृती-
आपण जे सर्वसाधारण पणे पोळ्यांसाठी जे गव्हाचे पीठ वापरतो त्यापेक्षा थोडस जाडसर पीठ आपल्याला डाळ बट्ट्या बनवण्यासाठी हवे असते. त्यामुळे आपण गिरणी मध्ये जाऊन त्यांना थोडंस जाडसर दळून द्यायला लावायचे.
आता आपण बट्यांसाठीच पिठ मळुयात.
पिठा मधेय अगोदर तुपाच मोहन करुन टाकायचे.
त्या नंतर त्यात ओवा, हळद, हिंग, मिठ (चवीनुसार) सगळ टाकुन घ्यावे. नंतर ते सगळ पिठ हातावर मळुन एकजीव करुन घ्यायचे.
त्या नंतर थोड-थोड पानी टाकुन ते पिठ मळुन घ्यायचे. पिठ मळताना लक्षात ठेवा, पिठ खुप पातळ न मळता पूरी साठी मळतो तस घट्ट पिठ ठेवा.
त्या नंतर पिठा चे एक सारख्या आकाराचे उंडे करुन घ्या. आता ह्या बट्या करायचे 2-3 पद्धती आहेत त्यानुसार तुम्हाला उंडे कसे बनवायचे हे ठरवावे लागेल.
पहिल्या पद्धतीत तुम्ही लाडवां सारखे उंडे करुन करु शकता
किंवा दुसरी पद्ध्त अशी आहे की जर पूड हवे असतील तर उंडा थोडासा लाटून घ्या, त्याला तेल किवा तुपाचा हात लावा एक दोन घड्या घालुन त्याची वळ्कुटी करा आणि ते पुन्हा जागेवरच दबुन घ्या.
ह्या बट्या दोन प्रकारे शिजवल्या जातात.
पहिली पद्धत- भाजुन
साधारणतः ह्या बट्ट्या पारंपरिक पद्धतीने गौर्यांचां आहार करुन त्यात भाजल्या जातात. पण आता शेणात हात टाकून त्याच्या गौऱ्या बनवणे हे सगळ फार किचकट आहे. आजच्या काळात हे सर्व कोनी करत पन नाही. (खानदेशात आजही देवाला अशाच प्रकारे भाजून नैवद्य दिला जातो)
तर यावर एक उपाय म्हणून आज आपण बघू कढईत ह्या बट्ट्या कश्या भाजता येतील.
थोडीशी जाडसर कढई १० ते १५ मिनिटे तापून घेयची त्या नंतर बट्या त्यात ठेवा. प्रत्येक २ ते ३ मीनिटानी त्या हलवत राहा. तांबुस लालसर होई पर्यत ह्या बट्ट्या भाजुन घ्याव्या. त्या नंतर त्यावर एक चमचा तुप एका बट्टी वर टाकायच. साधारण कढईत जर बट्या भाजत असतील तर अर्धा तास लागतो. भाजल्या नंतर ह्या बट्ट्या एकदम उकळून खरपूस होत
दुसरी पद्धत- तळून
कढईत पानी टाकुन ते तापून घ्या. त्यानंतर चाळणीला तुप लाऊन घ्या, त्यावर बट्ट्या ठेवा. ही चाळणी कढईत ठेवून कढाईला झाकण लावा. १० ते १५ मिनिटे ह्या बट्ट्या मध्यम गैस वर वाफवून घ्या.
तुम्ही इडली पात्रात ही बट्टी वाफवून घेऊ शकता.
वाफावलेली बट्टी थंड होऊ द्या. नंतर तिचे चार काप करा आणि तेलात किवा तुपात मंद आचेवर खमंग तळून घ्या.
ह्या बट्ट्या वरणा मधे चुरून खातात. तुमच्या आवडी नुसार तुम्ही वरण बनऊ शकता. (जीरे मोहरीची फोडणी देऊन, गुळ आम्सुलचे गोड वरण किवा तुमच्या आवडी नुसार तुमच्या पध्तीचे वरण) वरणात चुरलेल्या या बट्ट्यावर वर मस्त तुप टाकायच....आणि डाळ बट्ट्याचा आनंद घ्या.
त्याच प्रमाणे ह्या बट्ट्या मिक्सर मधून बरीक करुन त्यात साखर आणि तुप टाकुन देखील खाता त्यालाच "चोटिया चुरमा" म्हणता
0 Comments