Ticker

6/recent/ticker-posts

पौष्टिक व वेगळ्या पालेभाज्या (Leafy Vegetables)

पौष्टिक व वेगळ्या पालेभाज्या (Leafy Vegetables)

घरामध्ये सतत काही ना काही भाज्यांवरून वाद असतात त्यात आणखी भर पडणार यानंतर हे नक्की... परंतु आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक अशा काही वेगळ्या पालेभाज्या कशा बनवायच्या याविषयी आज जाणून घेऊयात.....

शेवग्याच्या पानांची भाजी


 शेवग्याच्या पानांमध्ये ' क ' जीवनसत्व असल्यामुळे जेवणातीठ लोहाचे शौषण वाढते . 
साहित्यः दोन वाट्या शेवग्याची कोवळी पाने, एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो ,पाच ते सहा लसूण पाकळ्या ,एक किंवा दोन हिरव्या मिरच्या ,चवीनुसार मीठ.
फोडणीचे साहित्य :
    एक छोटा चमचा जिरे व मोहरी , एक मोठा चमचा तेल.
कृती :
     प्रथम शेवग्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरा . टोमॅटो , कांदा , मिरच्या आणि लसूण बारीक चिरून घ्या . कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाका . तेल गरम झाल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी द्या . नंतर त्यात मिरची व लसूण टाका . मंद आचेवर लसूण तांबूस लाल झाल्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो परतून घ्या . कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत ते परता .त्यात शेवग्याची पाने टाकून हळूहळू परतून घ्या . चवीपुरते मीठ टाका . कढईवर झाकण न ठेवता मंद आचेवर भाजी शिजू द्या .

हरभऱ्याच्या पानांची भाजी 


हरभऱ्याच्या पानांमध्ये लोह असते आणि या पानांची भाजी चविष्टसुद्धा असते .
साहित्यः 
एक वाटी हरभऱ्याची कोवळी पाने, तीन छोटे चमचे बेसन पीठ, एक बारीक चिरलेला कांदा, एक छोटा चमचा वाटलेले, आले-लसूण ,दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या.
फोडणीचे साहित्य : 
दोन छोटे चमचे तेल , प्रत्येकी अर्धा छोटा चमचा जिरे व मोहरी , चिमूटभर हिंग
कृती :
 हरभऱ्याची पाने निवडून , स्वच्छ धुवून चिरा . कढईत तेल गरम करून जिरे , मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या . त्यात हिरवी मिरची व कांदा मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतून घ्या नंतर त्यात वाटलेलं आलं - लसूण टाका व पुन्हा परतवा . त्यात हरभऱ्याची पानं टाका व थोड्यावेळ शिमू द्या . वरून बेसन पीठ घालून हलवा आणि कढईवर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्या . वाळलेली बोरे उपलब्ध असल्यास ती भाजीत टाकावीत म्हणजे भाजीला चव चांगली येते .

कोथिंबिरीची भाजी 


जेव्हा कौथिंबीर स्वस्त असेल तेव्हा तिचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करून आपण शरीरातील लोहाचे शोषण वाढवू शकती . 
साहित्यः 
दोन वाट्या चिरलेली कोथिंबीर ,दोन किंवा तीन मिरच्या ,पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ.
फोडणीचे साहित्य :
 दोन छोटे चमचे तेल , प्रत्येकी एक छोटा चमचा जिरे व मोहरी 
कृती : 
कोथिंबीर धुवून चिरून कोरडी करून घ्या . एका कढईमध्ये मिरचीची फोडणी करा . त्यावर कोथिंबीर घालून झाकण ठेवा . कोथिंबीर मऊ झाल्यावर मीठ व हरभरा डाळीचे पीठ घाला.झाकण ठेवा . चांगली वाफ आल्यावर कढई खाली उतरावा .

आळूची पातळ भाजी


 आकू , हरभरा , गूळ या ठोहयुक्त पदार्थामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक असते . 
साहित्यः 
पाच वाट्या चिरलेली आळूची पाने ,पाव वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, दोन छोटे चमचे गूळ ,एक मोठा चमचा चिंचेचा कोळ ,एक मोठा चमचा बेसन पीठ, एक चिमूटभर हिंग, अर्धा छोटा चमचा हळद ,एकत्र वाटलेले एक इंच आले , अर्धी वाटी नारळ , तीन मिरच्या , अर्धी वाटी कोथिंबीर यांचे मिश्रण .
फोडणीचे साहित्य :
 एक छोटा चमचा तेल , प्रत्येकी अर्धा छोटा चमचा जिरे व मोहरी , चिमूटभर हिंग 
कृती :
 एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग , कापलेली आळूची पाने , भिजवलेली हरभराडाळ आणि शेंगदाणे टाकून दोन मिनिटे परता . त्यात हळद , चिंचेचा कोळ , एक वाटी पाणी , गूळ आणि मीठ टाका . हरभराडाळ शिजेपर्यंत मिश्रण परता . नंतर त्यात वाटलेले खोबरे , मिरच्या व कोथिंबिरीचे मिश्रण घाला . अर्धी वाटी पाण्यात बेसनपीठ मिसळा व ते शिजलेल्या भाजीत टाका . एका दुसऱ्या कढईत तेल , मोहरी , जिरे , हिंगाची फोडणी करा , भाजीत वरून टाका व मिश्रण थोडे हलवा .

चवळई मिश्र भाजी


 तीन प्रकारच्या भाज्या एकत्र केल्यामुळे ही भाजी अतिशय लोहयुक्त आणि पौष्टिक असते . 
साहित्यः
 दोन वाटी चवळई, एक वाटी पालक ,एक वाटी हरभऱ्याची पाने ,एक मोठा कांदा ,चार - पाच लसूण पाकळ्या ,चवीपुरते तिखट व मीठ
फोडणीचे साहित्य : 
चार छोटे चमचे तेल , पाव चमचा हळद , अर्धा चमचा जिरे - मोहरी , चिमूटभर हिंग 
कृती : 
सर्व भाज्यांची पाने स्वच्छ धुवा व चिरा . एका कढईत फोडणी करून त्यामध्ये कांदा व लसूण परतवा . त्यामध्ये सर्व पाने चिरून मिसळा व वरून मीठ तिखट घाला . हे मिश्रण मऊ होईपर्यंत परता . कढईवर झाकण ठेवून भाजी शिजवा .

Post a Comment

0 Comments