Ticker

6/recent/ticker-posts

नाष्ट्याची सोय

नाष्ट्याची सोय

Nashta recipes, nashta shira, upma, pohe

घरात सकाळी उशिरा जरी बेडवर पडून राहिलं तरी आई आपल्यासाठी नाष्ट्याची काही न काही व्यवस्था करून ठेवते, तरी कधी कधी तेच तेच पोहे, तोच शिरा, तसाच उपमा खाऊन कंटाळा येतो आणि आपण आईला ओरडतो. आईसमोर देखील प्रश्न उभा राहतो की नवीन नवीन काय बनवायचं? तर आज त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय चला तर बघूया असेच काही नाष्ट्याचे पदार्थ,

रवा मूगडाळ उपमा

रवा मूगडाळ उपमा, mugdal upma, moongdal upama

          गरमगरम उपम्यावर लिंबू पिळले असता उपम्याला एक वेगळीच चव येते . 

साहित्य-
           दोन वाट्या साधा रवा, पाऊण वाटी मुगाच्या डाळीचा रवा, चार - पाच हिरव्या मिरच्या, तीन छोटे कांदे, एक छोटा चमचा साखर, एक टोमॅटो, पाच वाट्या गरम पाणी, आवश्यकतेनुसार शेंगदाणे , कोथिंबीर आणि लिंबू चवीनुसार मीठ.

फोडणीचे साहित्य- 
          एक मोठा चमचा तेल , प्रत्येकी अर्धा चमचा जिरे , मोहरी , चार - पाच कढिपत्ते . 

कृती-
           मुगाची डाळ थोडीशी भाजून घेऊन बारीक वाटून रवा तयार करा मुगाचा आणि साधा असा दोन्ही प्रकारचा रवा लालसर भाजून बाजूला ठेवा . यानंतर एका कढईत तेल टाकून शेंगदाणे तळून घेऊन बाजूला काढा . त्यानंतर तेलामध्ये फोडणीसाठी जिरे , मोहरी , कढीपत्ता , मिरच्या आणि कांदा टाकून परता . कांदा लालसर झाल्यानंतर त्यात कापलेला टोमॅटो घाला व चवीनुसार मीठ घाला . सर्व मिश्रण चांगले परतून झाल्यावर दोन्ही प्रकारचा रवा घालून पुन्हा परतून घ्या व त्यामध्ये गरम पाणी घालून झाकून वाफ येईपर्यंत ठेवा.गरम गरम उपमा कोथिंबीर घालून व लिंबू पिळून खाता येईल .


दडपे पोहे


Dadpe pohe, pohe recipe

       दडप्या पोह्यांमध्ये टोमॅटी , खोबरे , कोथिंबीर , पोहे यांसारखे पदार्थ कच्चे घातल्यामुळे हे पोहे खूपच पीष्टिक असतात .

 साहित्य- 
        दोन वाट्या पातळ पोहे, पाव वाटी किसलेले ओले खोबरे, एक छोटा किसलेला किंवा चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, दोन मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू, पाव वाटी शेंगदाणे, आल्याचा एक इंच तुकडा 

फोडणीचे साहित्य -
         दोन छोटे चमचे तेल , तीन - चार कढिपत्ते , एक छोटा चमचा हळद , अर्धा छोटा चमचा मोहरी 

कृती- 
सुरूवातीला छोट्या कढईत फोडणी करून त्यात मिरची , कढिपत्ता व शेंगदाणे टाका.ही फोडणी कोरड्या पोह्यांवर वरून टाका.पोहे व्यवस्थित हलवून घ्या . नंतर त्यात किसलेले ओले खोबरे , आले , किसलेला किंवा बारीक केलेला कांदा व चिरलेला टोमॅटो टाका . यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ टाका . लिंबू पिळून पोहे चांगले मिसळा . फोडणी न देताही हे पोहे नुसते तेल व इतर साहित्य वरून घालून करता येतात .


मोड आलेल्या मुगाची खिचडी

Mugdal khichadi

        मोड आलेल्या मुगाची लोहयुक्त विचडी आपण रोजच्या जेवणातही बनवू शकती . 

साहित्य- 
         अर्धी वाटी मोड आलेले मूग, एक वाटी तांदूळ, एक छोटा चमचा वाटलेलं आलं - लसूण व खोबरे, तीन किंवा चार वाटलेल्या हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोंथिबीर, दोन टोमॅटो , दोन छोटे कांदे, उपलब्ध असेल तर एक छोटा चमचा गरम मसाला, हवे असल्यास किसलेले खोबरे, चवीनुसार मीठ 

फोडणीचे साहित्य - 
        एक मोठा चमचा तेल , प्रत्येकी अर्धा चमचा जिरे , मोहरी , हळद 

कृती - 
         ( मोड आणण्याची पद्धत : प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा.धुतलेले मूग ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा . नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये ८ ते १० तास घट्ट बांधून ठेवा . त्यानंतर मुगाला मोड येतात . ) कमीत कमी पाण्यामध्ये तांदूळ एक किंवा दोन वेळा धुवा . पातेल्यात तेल तापवून त्यामध्ये चिरलेला कांदा थोडा तांबूस होईपर्यंत परतून घ्या . चिरलेला टोमॅटो , आलं - लसूण , मिरची व नंतर मूग घालून मंद आचेवर थोडे परता . तांदूळ टाकून हे मिश्रण थोडा वेळ परता . त्यात चवीनुसार मीठ घाला . दोन ते अडीच वाटी पाण्यात मिश्रण शिजू द्या . खाण्यापूर्वी चिरलेली कोथिंबीर , हवे असल्यास किसलेले खोबरे टाकून व लिंबू पिळून खिचडी खाता येईल .


कोबीचा उपमा

Gobis upma, कोबीचा उपमा

       गव्हाचा उपमा कोबीमुळे आणि लिंबू पिळल्यामुळे अधिक चवदार लागतो.

साहित्य -
        वाट्या गव्हाचा रवा, दोन वाट्या चिरलेला कोबी, अर्धी वाटी मटारदाणे, एक छोटा चमचा उडिद डाळ, तीन छोटी गाजरे, तीन - चार हिरवी मिरची, अर्धी वाटी कोथिंबीर, एक लिंबू, चवीपुरते मीठ 

फोडणीचे साहित्य-
        एक मोठा चमचा तेल , प्रत्येकी अर्धा चमचा जिरे , मोहरी , मेथ्या , हळद , पाच - सहा कढिपत्ते 

कृती-
         रवा स्वच्छ करा . गाजराचे लांब पातळ तुकडे करा . थोडे तेल गरम करा . त्यामध्ये रवा टाकून ५ मिनिटे परता व लालसर रवा बाजूला काढून ठेवा . नंतर एका पातेल्यात फोडणी करून त्यात मटार , गाजराचे काप आणि गरम पाणी घालून अर्धवट शिजवा . त्यानंतर त्यात रवा घाला . आच कमी करा . मिश्रणात कोबी घाला व पुन्हा काही वेळ शिजवा . त्यावर लिंबाचा रस घाला . गरम असतानाच वर कोथिंबीर घालून खायला द्या .



शिरा

रव्याचा शिरा, suji halwa, shira

      आपल्या नेहमीच्या शिऱ्यात मूगडाळ रवा घातला असता हा पौष्टिक शिरा तयार होती . 

साहित्य -
    एक वाटी रवा, पाऊण वाटी मूग डाळ, रवा दोन ते अडीच वाटी, गूळ, अर्धी वाटी तूप, चार वाट्या पाणी 

कृती - 
     मुगाच्या डाळीचा रवा काढताना , डाळ मंद आचेवर थोडी भाजून घ्या व रवा काढून आणा . हा रवा नेहमीच्या रव्याइतका माड असावा . सर्वप्रथम पातेल्यात तूप घालून त्यावर साधा रवा बदामी रंगावर भाजून घ्या , त्यानंतर लगेच मूग - डाळ रवा भाजा . एकीकडे एका पातेल्यात पाणी व गूळ एकत्र करून उकळत ठेवा.हे पाणी चांगले उकळल्यावर ते भाजलेल्या रव्यामध्ये घाला . झाकण ठेवून शिरा चांगला शिजेपर्यंत वाफ आणा. गुळाऐवजी साखर वापरूनही हा शिरा चांगला होतो .

मोड आलेल्या कडधान्यांची भेल

 चटपटीत असलेला हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जाईल .

साहित्यः 
एक वाटी चुरमुरे, पाव वाटी मोड आलेले मूग, पाव वाटी बारीक कापलेले टोमॅटो, अर्धा वाटी पेरूचे तुकडे, अर्धी वाटी शेव, पाव वाटी कापलेली कोथिंबीर, चार छोटे चमचे लिंबाचा रस, पाव चमचा काळे मीठ किंवा साधे मीठ

 फोडणीचे साहित्य : 
अर्धा चमचा जिरे , चिमूटभर हिंग , पाव छोटा चमचा हळद , अर्धा चमचा तेल

कृती : 
( मोड आणण्याची पद्धत : प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा . धुतलेले मूग ५ ते तास पाण्यात भिजत ठेवा . नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये ८ ते १० तास घट्ट बांधून ठेवा . त्यानंतर मुगाला मोड येतात . ) एका कढईत तेल घेऊन त्यामध्ये जिरे , हिंग , हळदीची फोडणी टाकून त्यात चुरमुरे मिसळा . कढई खाली उतरवून त्यात काळे मीठ व शेव टाकून मिश्रण थंड करा . नंतर त्यात मोड आलेले मूग , कापलेला टोमॅटो , पेरूचे तुकडे , कापलेली कोथिंबीर , लिंबाचा रस टाका . चटपटीत भेळ तयार होईल . बदलत्या हंगामानुसार आपण वेगवेगळी फळे भेळेत टाकू शकता .

कोथिंबिरीचे वडे 

नेहमीच्या कौथिंबीरीची चव वडे केले असता वेगळीच लागेल .

साहित्यः 
एक जूडी कोथिंबीर, एक वाटी भिजवलेली हरभरा डाळ ,चवीप्रमाणे वाटलेली हिरवी मिरची ,अर्धा छोटा चमचा जिरेपूड व धनेपूड, अर्धा छोटा चमचा ओवा, आवश्यकतेनुसार मीठ

कृती :
 भिजवलेली हरभऱ्याची डाळ रवाळ वाटून घ्या . त्यामध्ये धनेपूड , जिरेपूड , ओवा व वाटलेली हिरवी मिरची घाला . नंतर त्यात धुवून कोरडी करून चिरलेली कोथिंबीर , मीठ व थोडे पाणी घाला . मिश्रण कणकेप्रमाणे घट्ट करून त्याच्या गोल सुरळ्या बनवा. कुकरमधील डब्याला तेलाचा हात लावून सुरळ्या डब्यात ठेवा.कुकरमध्ये पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या . कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेऊन वाफवून घ्या . गार झाल्यावर त्याचे काप करून तळा किंवा फोडणीवर परता .

मेथी व रव्याचे वडे 

मेथी आणि त्याचे गरम - गरम वडे पुदिन्याच्या चटणीबरोबर खाल्लयास वडयांना छान स्वाद येतो .

साहित्यः 
एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ ,पाव वाटी मैदा ,एक मोठा चमचा भाजलेला रवा, एक वाटी चिरलेली मेथी ,एक छोटा चमचा मेथीपूड ,एक छोटा चमचा तीळ ,चिमूटभर हिंग व एक छोटा चमचा हळद ,तळण्यासाठी तेल ,चवीप्रमाणे मीठ .

कृती : 
डाळीचे पीठ , मैदा , भाजलेला रवा व चिरलेली मेथी एकत्र करून त्यामध्ये मीठ , तीळ , हळद , हिंग व मेथीपूड टाका , दोन छोटे चमचे गरम तेल घाला . पीठ पाण्याने घट्ट मळा त्यांची गुंडाळी करून कुकरच्या डब्यात ठेवा . कुकरमध्ये पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या . कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेऊन वाफवून घ्या . गार झाल्यावर त्याचे काप करून तळा किंवा फोडणीवर परता . . . .

मेथीचे बटाटेवडे 

आपल्या नेहमीच्या बटाटेवड्यांमध्ये मेथी टाकली असता त्यांची चव बदलते आणि ते पौष्टिकही बनतात .

साहित्यः
एक लहान वाटी मेथीची पाने ,दोन मध्यम आकाराचे बटाटे ,अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ ,आवश्यक असल्यास एका लिंबाचा रस, चवीनुसार तिखट व मीठ ,तळण्यासाठी तेल

कृती : 
मेथीची पाने धुवून बारीक चिरून घ्या . बटाटे उकडून त्यांची साले काढून चांगले मळा . त्यामध्ये तिखट , मीठ , मेथीचे पाने मिसळा . या मिश्रणात लिंबाचा रस मिसळला तरी चालतो . हरभरा डाळीचे पीठ भज्यांच्या पिठासारखे भिजवा . त्यामध्येही चवीप्रमाणे तिखट मीठ घाला . बटाटा मिश्रणाचे लहान गोळे करून हरभरा डाळीच्या पिठात बुडवा व गरम तेलात तळा .

पालेभाज्यांचे वडे

 पालेभाज्यांच्या हंगामानुसार आपण त्या - त्या पालेभाज्यांचे रुचकर वडे बनवू शकती .

साहित्यः
 एक वाटी बारीक चिरलेला पालक एक वाटी बारीक चिरलेला कोबी, एक वाटी बारीक चिरलेली मेथी ,एक वाटी कोरडा भाजलेला रवा, एक वाटी भाजलेले हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, एक छोटा चमचा वाटलेले आले व लसूण ,दोन - तीन हिरव्या मिरच्या ,चिमूटभर हिंग ,एक छोटा चमचा लिंबूरस ,तळण्यासाठी तेल

कृती :
 प्रथम आले , लसूण , मिरची , हिंग हे सर्व एकत्र बारीक वाटून घ्या . पालक , कोबी , मेथी , रवा , डाळीचे पीठ हे साहित्य एकत्र मिसळून यामध्ये सर्व वाटलेले पदार्थ मिसळा , त्यात लिंबाचा रस आणि पाणी घालून मळून घ्या . कुकरमधील डब्याला तेलाचा हात लावून सुरळ्या उब्यात ठेवा . कुकरमध्ये पाणी घालून उब्यातील सुरळ्या वाफवून घ्या . कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेऊन वाफवून घ्या . गार झाल्यावर त्याचे काप करून तळा किंवा फोडणीवर परता . . .

पालक भजी

 पालकाच्या पानांप्रमाणेच कुठल्याही पालेभाज्या , ओव्याची पाने , विड्याची पाने , चिरलेली आळूची पाने यांची भजी तयार करता येतात .

साहित्यः
 पालकची पाने, एक वाटी हरभरा डाळीचे पीठ ,चवीपुरते मीठ व तिखट ,पाव छोटा चमचा हळद ,प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व ओवा, तळण्यासाठी तेल

कृती : 
हरभरा डाळीच्या पिठामध्ये तिखट , मीठ , ओवा व पाणी घालून भज्याच्या पिठासारखे भिजवा . पालकाची पाने निवडून धुवून घ्या व डाळीच्या पिठात प्रत्येक पान बुडवून गरम तेलात तळा.गरम असतानाच खायला द्या .

आलू वडी 

खुसखुशीत असलेली आळूची वडी पौष्टिक असते .

साहित्यः
 सहा - सात आळूची पाने, दीड वाटी डाळीचे पीठ ,चार - पाच हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा जिरे, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक छोटा चमचा वाटलेले आले व लसूण ,पाव वाटी भिजलेल्या चिंचेचा कोळ ,एक छोटा चमचा खसखस ,अर्धा छोटा चमचा हळद, सुपारीएवढा गूळ .

कृती : 
प्रथम आळूची पाने स्वच्छ धुऊन घ्या . नंतर डाळीच्या पिठात वाटलेले आले व लसूण , हळद , खसखस , चिंचेचा कोळ आणि बारीक केलेला गूळ मिसळा . चवीनुसार मीठ घाला व पीठ भज्याच्या पिठासारखे सैलसर भिजवून घ्या . पाटावर आळूचे एक पान घेऊन त्यावर हे पीठ सगळीकडे लावून घ्या . नंतर त्यावर पुन्हा दुसरे पान ठेवा व पुन्हा त्यावर पीठ लावून घ्या . अशी साधारणपणे तीन ते चार आळूची पाने लावा . .नंतर त्या पानांची गुंडाळी करून दोन्ही कडांनासुद्धा पीठ लावून बंद करा . याप्रमाणे सर्व पानांच्या सुरळ्या करा : नंतर पाणी ठेवलेल्या पातेल्यात चाळणी ठेवून अथवा कुकरमध्ये ठेवून सुरळ्या वाफवून घ्या . थंड झाल्यावर त्या पातळ कापून तव्यावर थोडे तेल टाकून भाजून घ्या .

कोबीची वडी 

नेहमी - नेहमी कोबीची भाजी खाऊन कंटाळलेल्यांसाठी कोबीची स्वादिष्ट वडी म्हणजे चांगठा बदल होईल .

साहित्यः 
एक वाटी किसलेला कोबी, अर्धी वाटी डाळीचे पीठ, तीन - चार हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा आले व लसूण यांचे वाटलेले मिश्रण, अर्धा छोटा चमचा जिरे, पाव छोटा चमचा हळद ,चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :
 किसलेल्या कोबीमध्ये आले - लसूण व हिरव्या मिरच्या यांचे वाटलेले मिश्रण , हळद , जिरे व मीठ टाका . नंतर त्यामध्ये डाळीचे पीठ टाकून मिश्रण कणकेसारखे घट्ट मळा . या मिश्रणाच्या सुरळ्या करून त्या कुकरच्या डब्यात ठेवा.कुकरमध्ये पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या.कुकर उपलब्ध नसल्यास पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीत सुरळ्या ठेवा व चाळणीवर झाकण ठेऊन वाफवून घ्या . गार झाल्यावर त्याचे काप करून तळा किंवा फोडणीवर परता .

मोड आलेल्या मसुराचा पुलाव

 ' क ' जीवनसत्वयुक्त लिंबू , कोथिंबीर यासाररवे पदार्थ असल्यामुळे हा पदार्थ सर्वच दृष्टीने पौष्टिक असती .

साहित्यः 
एक वाटी तांदूळ ,अर्धी वाटी मोड आलेले मसूर ,अर्धी वाटी कापलेले गाजराचे पातळ काप ,एक छोटा चमचा गरम मसाला, एक छोटा कांदा व लिंबू ,दहा पाकळ्या लसूण, अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे ,पाव वाटी चिरलेली कोथबीर ,अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार तेल

कृती : 
( मोड आणण्याची पद्धत : मसूर पाण्याने धुवा.धुतलेले मसूर रात्रभर भिजवून नंतर ते स्वच्छ कापडामध्ये बांधून ठेवा . एक दिवसामध्ये मसुराला मोड येतात . ) कमीत कमी पाण्यामध्ये तांदूळ दोन वेळा धुवा.धुतलेले तांदूळ अर्धवट शिजवून घ्या . दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यात हळद , वाटलेले लसूण व आलं टाका . त्यात मोड आलेले मसूर गरम मसाला व मीठ टाकून भरपूर पाण्यामध्ये शिजवा . नंतर एका पातेल्यात अर्धवट शिजवलेले अर्धे तांदूळ पसरून टाका . त्यावर शिजवलेल्या मसूराचा थर टाका . या थरावर उरलेले तांदूळ टाका.वरून तेल किंवा तूप टाका . गरजेनुसार त्यात थोडेसे पाणी शिंपडून पातेल्यावर झाकण ठेऊन ते सर्व शिजू द्या . वाढताना त्यावर किसलेले खोबरे , गाजराचे काप व कोंथिबीर टाकून सजवा आणि लिंबाबरोबर वाढा .

डाळ आणि भाज्यांची इडली

 प्रत्येक हंगामाप्रमाणे वेगवेगळ्या इडलीमध्ये टाकून आपण इडठीचा स्वाद घेऊ शकतो .

साहित्यः 
अर्धी वाटी तूरडाळ, पाव वाटी मुगडाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ ,एक वाटी कापलेली मेथी, दोन वाट्या कापलेली कोथिंबीर, पाव वाटी किसलेला नारळ ,पाव वाटी ओला वाटाणा, तीन - चार हिरव्या मिरच्या, एक बारीक चिरलेला लहान कांदा, पाव वाटी किसलेले गाजर ,चवीनुसार मीठ .

कृती : 
सर्व डाळी एकत्र धुवून तीन तास भिजत ठेवा . डाळींमधील पाणी काढून बारीक वाटून घ्या . त्यामध्ये मेथी , कोथिंबीर , उकडून बारीक केलेला ओला वाटाणा , किसलेला नारळ , चिरलेला कांदा , गाजर व चवीपुरते मीठ घालून एकत्र मिश्रण तयार करा . आवश्यक वाटल्यास पाणी घालून मिश्रण थोडे पातळ बनवा . इडलीच्या साच्याला थोडे तेल लावून त्यात हे मिश्रण घाला व १०-१५ मिनिटे उकडून घ्या . इडली पुदिन्याच्या किंवा कोथिंबिरीच्या चटणी बरोबर खायला द्या .

कोबी पुलाव

 वरण - भाताऐवजी कधीतरी कोबी पुलाव आपण बदठ म्हणून खाऊ शकतो .

 साहित्यः 
दोन वाट्या तांदूळ ,दोन वाट्या चिरलेला कोबी, अर्धी वाटी मटारदाणे ,अर्धी वाटी गाजराचे काप, एक छोटा चमचा गरम मसाला, दोन छोटे चमचे लिंबाचा रस, एक मोठा चमचा तेल ,अर्धी वाटी कोथिंबीर, चवीपुरते मीठ .

कृती :
 तांदूळ धुवून १५ मिनिटे पाण्यात तसेच ठेवा . नंतर पाण्यातून बाहेर काढा व तेलावर परता त्यामध्ये कोबी , चिरलेले गाजर , मटारदाणे , गरम मसाला व पाणी घाला मऊ होईपर्यंत शिजवा लिंबाचा रस व कोथिंबीर घालून वाढा .

Post a Comment

0 Comments