Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे: कान्होजी जेधे

स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे: कान्होजी जेधे

Kanhoji jedhe

श्रीकृष्णाच्या जन्मावेळी पालकांना जो जाच सहन करावा लागला त्याचप्रमाणे कान्होजींच्या आयुष्यात देखील असाच जाच सहन करावा लागला. श्रीकृष्णाला कंस मामा ने मारण्याचा प्रयत्न केला इथे वतनासाठी स्वतःचे चुलतेच जीवाचे वैरी बनले होते.

स्वराज्याच्या कामात बाजी पासलकरांच्या निधनानंतर सर्वात जास्त महत्त्वाचे कार्य आणि आदिलशाहीत राहून थोरल्या महाराजांप्रमाणेच महाराजांवर वडीलधारा आधार देखील कान्होजींचा होता. पुढे स्वराज्यात संभाजी राजांच्या काळात वतनासाठी गद्दारी करणारे आपण बघतो पण कान्होजी जेधे म्हणजे स्वराज्याच्या कामासाठी वतनावर पाणी सोडलेले एक स्वराज्यनिष्ठ वतनदार!
स्वराज्यासमोर वतनावर पाणी सोडणारे: कान्होजी जेधे

रायरेश्वराच्या पायथ्याशी वसलेले कारी गाव म्हणजे निजामशहा च्या अधिपत्याखाली असलेले एक समृद्ध गाव. परंतू भाऊबंदकी हि नावलौकिकाला सर्वात जास्त घातक असते हे खरे. जेधे परिवारातील जेष्ठ पुत्र नाईकजी जेधे आणि त्यांच्या पत्नी अनुसया आपल्या कारी येथील वाड्यात राहात होते. निजामशहा ने रायरेश्वराच्या पायथ्याशी असेलेल्या कारी व आंबवडे गावांची देशमुखी जेधेना दिली होती. 

देशमुखी मोठ्या भावाकडे असणे हे सोनजी व भिवजी यांना मान्य नव्हते. दोघांनी मिळून नाईकजीचा खून केला आणि जणू काही असे दाखवू लागले कि त्यांनी काही केलेच नाही. कारीचा वाडा रक्ताने नाहला होता, अनुसया म्हणजेच कान्होजींच्या आई, देवजी महाले या सेवकाने यांना वाचवले आणि अशाच परिस्थितीत कान्होजींचा जन्म झाला.
Kanhoji jedhe

देवजी महाले, आई अनुसया, कान्होजी आणि एक दाई व तिचा मुलगा या वाड्यात रहात होते. एक दिवशी भिवजी आणि सोनजी यांनी पुन्हा हल्ला केला, दाई ने अनुसया कडून कान्होजीना घेतले आणि कान्होजीना देवजी कडे देऊन देवजी मागच्या दरवाजाने पळत सुटले, डोंगरदर्यांतून कान्होजीला घेऊन जात होते. याच वेळी अनुसयेला भिवजी व सोनजी ने मारले, पाळण्यात असलेल्या कान्होजीना म्हणजेच त्या दाईच्या मुलाला देखील मारले व त्या दाईची हत्या केली. कारीचा वाडा पुन्हा रक्ताने धुतला गेला, त्या दोघांच्या मते आता नाईकजीचा वंश संपला. भिवजी व कावजी ने मिळून लोकांवर जुलूम सुरु केले आणि कारी प्रांत पुन्हा दुःखाच्या सागरात बुडाला.

कान्होजी जेधे व बाजी पासलकर संबंध 

Baji and kanhoji

देवजी कान्होजीला घेऊन डोंगरदर्यांमधून फिरत होता, मांढरगाव चे कान्होजींचे आजोळ तिथे देखील देवजी कान्होजीना घेऊन गेले, परंतु मांढरे मामांनी त्यांना भिवजी व सोनजीना घाबरून आसरा देण्यास नकार दिला. देवजी घाबरले नाही अथवा डगमगले नाही, आता आशेचा एकच किरण होता तो म्हणजे बाजी पासलकर! संपूर्ण मावळ प्रांतात सर्वात जास्त चर्चा होती ती बाजींच्या दिलदारपणाची, त्यामुळे देवजी मोसे खोऱ्यात आश्रयाला आले.

बाजींनी देवजी ला निजामाच्या दरबारात नाईकजिंसोबत निजामशहा च्या दरबारी बघितले होते. बाजींनी कान्होजीना आसरा दिला व त्यांना पुढे घरातील एक सदस्यच माणू लागले. पुढे बाजींनी कान्होजीना घोडेस्वारी, शस्त्रविद्या शिकवली. पुढे त्यांनी आपली मुलगी सावित्री सोबत कान्होजींचा विवाह लावून दिला.

बाजींनी कान्होजीना त्यांच्या चुलत्यांविषयी आणि घटनांविषयी सांगितले त्यानंतर कान्होजी व बाजी  यांनी काही कारीवर स्वारी केली. बाजींच्या नावाला घाबरूनच हे युद्ध संपले होते. कान्होजीनी भिवजी व सोनजी यांना पकडून त्यांना शिक्षा दिली. कारी परिसरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण पसरले.

कान्होजी आणि शहाजी राजे


त्यानंतर आदिलशहा कडे असताना कान्होजी रनदुल्लाखानाच्या सोबत होते. शहाजी राजांचा असफल निजामशाहीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुघल व आदिलशहा ने  माहुली गडाला दिलेल्या वेढ्यात तहाची बोलणी होऊन राजे आदिलशाहीत रुजू झाले. शहाजीराजे कर्नाटक जहागिरीवर निघाले तेव्हा त्यांनी कान्होजीना आपल्या सोबत घेतले व कान्होजी शहाजीराजांचेच झाले.

शिवरायांच्या स्वराज्याला विरोध म्हणून आदिलशहा ने शहाजी राजांना अटक केली तेव्हा त्यांच्या सोबत कान्होजी व दादाजी कृष्ण लोहोकरे यांना देखील अटक झाली. जिंजीच्या कैदेत हे सर्व सोबत होते. शिवाजी महाराजांनी खेळलेल्या चालीनंतर यांची सुटका करण्यात आली. कैदेत असताना स्वराज्याने बाजी पासलकर गमावले होते त्यामुळे आता स्वराज्याला एका वडिलधाऱ्या योद्ध्याची गरज होती. शहाजी राजे हे जाणून होते त्यामुळे त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी कान्होजीना महाराजांकडे पाठवले.

स्वराज्याच्या कामात कान्होजी जेधे


स्वराज्याच्या कार्यात असताना कान्होजीना कारी गावाची देशमुखी देखील होती. अफजलखानाच्या हल्ल्यावेळी अफजलखानाने सर्व देशमुखांना महाराजांविरोधात जाण्याचे आवाहन केले व बक्षिसी रकमा देखील जाहीर केल्या. खंडोजी खोपडे सारखे काही वतनदार देशमुख खानास मिळाले देखील. कान्होजीनी या वेळी आपल्या वतनावर पाणी सोडले आणि कान्होजी स्वतः त्यांच्या पाच मुलांसमवेत स्वराज्याच्या कामात रुजू झाले. इतकेच नाही तर आपल्या प्रांतातील सर्व देशमुखांना महाराजांसोबत राहण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला मान देत कानंद खोऱ्यातील झुंजारराव , पौंडचे ढमाले, मुठाचे मारणे हे देशमुख महाराजांसोबत आले. अफजलखानाच्या वधाच्या वेळी कान्होजीनी खूप मोठी कामगिरी केली होती. कान्होजींचे पुत्र बाजी देखील पराक्रमी होते.

यासोबतच पन्हाळा सुटकेच्या वेळी कान्होजीनी बरीचशी मदत हि महाराजांना झाली. अफजलखानाच्या वधाच्या वेळी केलेल्या मोठ्या कामगिरीमुले कान्होजीना तलवारीचे पहिले मानाचे पान मिळाले होते. कान्होजींचा मुलगा बाजी यास सर्जेराव हा किताब मिळाला.

पन्हाळा सुटकेच्या वेळी बांदलांनी मोठा पराक्रम केला.यानंतर एका सभेत महाराजांनी बांदलांना मानाचे पहिले पान महाराजांनी जाहीर केले. बांदल आणि जेध्याचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले वैर! हे सर्व विसरून कान्होजीनी त्यांच्या पराक्रमाची दाद देत हे पान त्यांना देऊ केले. महाराजांचा वैर थांबण्याचा एक अनोखा प्रयत्न येथे यशस्वी झाला.

कान्होजी हे बराच काळ आजारी होते. महाराजांना ते सल्ला देत पण आपल्या कारी गावातील वाड्यातूनच. आजारपणाने कान्होजीना कारी येथील त्यांच्या वाड्यातच मरण आले. स्वराज्याचा एक आधार हरपला परंतु तोपर्यंत स्वराज्याचा खूप भक्कम पाया रचला गेला होता.

आजही ‘कारी’ त असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. आंबवडे येथे कान्होजींची समाधी आहे. प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास आंबवडेस जरूर जावे. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल……

कान्होजी जेधे विषयी पुस्तके-





Post a Comment

0 Comments