Ticker

6/recent/ticker-posts

आत्मनिर्भर भारत : कोणासाठी? कसे? आणि का?

आत्मनिर्भर भारत : कोणासाठी? कसे? आणि का?




या विषयाची सुरुवात मला या फोटो पासून करावी वाटते.. खरतर..माणसाची जीवन जगण्याची चिवट इच्छाशक्ती दिपवून टाकणारा आशावाद ,म्हणजे आपणच जगू की नाही ह्याचीच खात्री नसलेला एक मजूर कामगार किंवा 
स्थलांतर करून पोट भरणारा एक माणूस...
अशीच निर्दयीपणे वाऱ्यावर सोडून दिलेली हजारो लाखो करोडो माणसं घरी जातायत ..मग आज ५३ दिवसांनी वैगरे घरी घेऊन काय जावं ? तर एक रोपटं ! स्वतः जगू इतरांनाही जगवू एवढं वैश्विक  तत्वज्ञान सांगायला कुठल्या युनिव्हर्सिटी मधला कोर्स करावा लागत नाही.

    स्वतः जगू की मरू अशी स्थिती असताना ही कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्व द्यायचं हे सर्वसाधरण एका मजूर किंव्हा कामगारांना कळू शकते. तर हा लेख वाचणाऱ्या ना आणि स्वतःला सुशिक्षिततेच्या पारड्यात मोजनाऱ्यांना नक्कीच कळाली पाहिजे.     

      आजचा लेख लिहण्या मागचं कारण एवढंच की ...अमेरिका सारखे महासत्ता असलेलं राष्ट्र ज्यांचे हात अवकाश पर्यंत जाऊन पोहचले , त्यांना देखील चीन सारख्या देशाने गुढगे टेकायला लावले.(यावर आजही शंका आहे पण संपूर्ण जग बोलतंय की चीन ने केलंय म्हणून) मग आपण हा विचार का करत नाही की उद्या आपल्याला ही चीन गुलामगिरीच्या छत्रा खाली वाढवायला सुरुवात करेल. 

   इतिहासात विचार केलाच तर, १६६३ साली शिवाजी महाराजांनी विदेशी वस्तूंवर जास्तीत जास्त कर घेतला परिणामी जास्तीत जास्त जनता म्हणजेच रयत आपल्या इथल्या स्वस्त स्वदेशी वस्तू वापरायला लागली. महाराजांच्या या निर्णया मागील कारण आपल्या देशातील वस्तूंना जास्त मागणी व्हावी व आपला ही देश आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवा हे होते. तर १९०५ साली सुरू झालेली स्वदेशी चळवळ! या मधे म्हाळुंगे पडवळ येथील बाबू गेणू या देशभक्त ला आपला जीव गमवावा लागला. महात्मा गांधींनी खादीचा वापर आणि निर्मिती जास्त प्रमाणात सुरू केली आणि स्वदेशी चा जणू पुरस्कार च केला होता. स्वदेशी - विदेशी हा मुद्दा बंद काळापासून - अधिरकाळापासून ते आधुनिक काळा पर्यंत चालत आलेला म्हणजेच शिवकाळ पासून -स्वतंत्र काळा पासून ते आताच्या २१ व्या शतका पर्यंत चालत आलेला आहे.

मोदींचे आत्मनिर्भर अभियान

आता आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान हाती घेतलंय. आत्मनिर्भर भारत याचा अर्थ खरा सगळ्यांनी समजून घ्यायला हवा. आत्म निर्भर म्हणजे आपला भारत देश पूर्णपणे स्वतःच्या बळावर उभा राहू शकतो अशी ताकद भारताला बनवणे. सध्या lockdown आहे, आणि बाहेरील देशातील माल भारत येत नाहीये, कधी आपल्याला आता अशा काही गोष्टी आहेत ज्या घ्यायच्या आहेत पण त्या मिळत नाहीयेत. कारण एकच की ती वस्तू भारतात तयार होत नाही किंवा तिला लागणार कच्चा माल अथवा तिची सप्लाय चेन आपल्याकडे तुटलीये. मोदींच्या या निर्णयाचे कौतुक देखील करायला हवे( आम्ही कुठल्याही पक्षाचे नाहीये, जे सत्य आणि योग्य त्याला आमचे समर्थन नक्की असेल), भारताचा GDP 5% आहे सध्या आणि काही काळाने जर असेच सुरू राहीले तर कदाचित तो 0.8% पर्यंत जाईल असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे. जर आपण पूर्ण पणे भारतात बनवलेल्या वस्तूच घेत राहिलो पुढील 3 महिने जरी तरी आपली अर्थव्यवस्था ही खूप पुढे जाईल. याचे कारण एकच कारण भारतातील कारखान्यांमध्ये जास्त उत्पादन सुरू होईल आणि जे मजदूर आज गावी परतताय त्यांना हाताला काम मिळेल आणि कोरोना सारख्या महामारी पासून त्यांचा बचाव होईल, जास्त तो पसरणार नाही आणि त्यांच्या आर्थिक अडचणी देखील कमी होतील. 

    माझे माझ्या देशावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक च वेळी सीमेवर जाऊन लढायची गरज नाही तर फक्त स्वतःच्या देशाचे उत्पादन खरेदी करा. सिद्ध करा की आपल्या देशाची आर्थिक स्थिती १३० करोड लोकांवर अवलंबून आहे आणि ते १३० करोड लोक ती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडतात.

    मग नक्कीच आज जे बोलतात भारत गरीब देश आहे . त्यांना परत पूर्वीच्या "सोने की चिडिया" वाल्या भारताची आठवण येईल. पंजाबच्या मायभूमीत पिकणारे धान्य, हिमालयाच्या थंडीत पिकणारी फळे, आसामचा चहा , महाराष्ट्राचा हापूस आणि किती किती किती...अरे सगळ्यात बाबतीत संपूर्ण असा भारत देश माझा...

का आपण यात सहभागी व्हावे?


    आजची परिस्थिती पाहता..
आर्थिक विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर एकूण विदेश गुंतवणुकीचे प्रमाण हे देशांतर्गत  गुंतवणुकीच्या तुलनेत कायम अत्यल्पच राहणार. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या वा विदेशी गुंतवणूक भारतीय उद्योग धंद्यांना नेस्तनाबूत करेल ही भीती मनात आहेच..

    चीनच्या हलगर्जी पणामुळे आज आपल्या देशात २००० लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत. यामध्ये लाखो लोक बेरोजगार झालेत. बेरोजगार आहेतच त्यात हे आणखी प्रमाण वाढलंय. अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात खूप साऱ्या प्रमाणात नोकरीला असलेले भारतीय आणि आखाती देशांत असणारे भारतीय नोकरी नसल्यामुळे भारतात येणार. किती बेरोजगारी वाढणार याची कल्पना तुम्हाला देखील आली असेल आणि जर या संकटावर मात करायची असेल तर आत्मनिर्भर बनने खूप गरजेचे आहे.

     भारत एकूण १९० विदेशी कंपन्यांन सोबत व्यापार करतो. ज्या मधे भारताला ६०% व्यापारिक तोटा होतो. त्यातील ४२% तोटा आपल्याला एकट्या चीन कडून होतो. म्हणजे प्रतिवर्ष आपण चीन ला  ३ हजार ५४२ अरब रुपये देतो. एवढ्या पैशांमधून आपण २१०० ब्रह्मास्त्र मिसाईल खरेदी करू शकतो. 

     चीन ला आपली स्वस्त माल खरेदी करण्याची मानसिकता माहित झाली . जर आपण आताच ही मानसिकता बदलली नाही तर आपल्याला गुलामगिरीच्या आणि बेरोजगारीच्या कचाट्यात सापडायला खूप वेळ लागणार नाही.
  
    चीन एकीकडे आपल्या च बाजार चा जास्तीत जास्त उपयोग करणार  तर दुसरीकडे  दहशतवादासारख्या मुद्द्यांवर पाकिस्तान सोबत उभ राहणार . जर देशातील सर्व लोक चिनी वस्तूंवर बहिष्कार घालू लागले तर चीनची आर्थिक परिस्थिती ढासळेल. भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयाला येईल या भीतीने  चीनने इतर 6 देशांसह उभे राहून भारताच्या एनएसजीमधील आपल्याच सदस्यतेवर बंदी घातली आहे. भारतासाठी अडचणी निर्माण करणे, पाकिस्तानच्या विरोधकांना पाठिंबा देणे हे चीन चे अघोषित धोरण बनले आहे. 

टिक-टॉक वर टीका


     आपल्या देशामधील तरुण वर्ग जास्तीत जास्त वेळ टिक टॉक वापरण्यात व्यस्त आहे. टिक टॉक वापरणे चूक आहे अस नाही. पण कोणत्या गोष्टी लां किती वेळ द्यायचा हे पूर्णतः आपल्यावर आहे. ज्या चीन ने हे टिक टॉक अॅप निर्माण केले त्याच चीन मधील तरुण जास्तीत जास्त वेळ पुस्तके वाचण्यात आणि स्वतःच्या कंपन्या उभारण्यात घालवतात. आज जर आपण भारतात टिक टॉक बंद केलं तर त्या कंपनी ला ७,५५,३२,५०० चे नुकसान जेलावे लागेल त्याच बरोबर २५० पेक्षा जास्त चिनी  कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागेल. कोणी जर तंत्रज्ञान विश्वात पारंगत असेल तर विचार करा जर अशीच कंपनी आपण उभी करू शकलो तर आणि इतरांना नोकरी देऊ शकलो तर? विचार करा आणि तुमच्या ज्ञानाचा आता असा वापर करायची वेळ आली आहे.

असो , आपण त्यांच्या गोष्टी वापरून आपल्याच देशात एक कामगार म्हणून दुसऱ्या देशातील कंपन्यांमध्ये काम करायचं आणि गुलामगिरी मधे राहायचं की पुस्तके वाचून आणि स्वतःच्या गोष्टी निर्माण करून आपल्या च देशात राजा म्हणून राहायचं हे सर्वस्वी आपल्यावर आहे. स्वराज्य हे महाराजांनी संकल्पिले असले तरी ते पूर्तीला नेण्याचं काम हे सामान्य माणसाने म्हणजेच रयतेने केलं, हे देखील विसरून चालणार नाही. आज आपल्याला भारत मातेचे सेवक बनण्याची गरज आहे, जात धर्म पंथ रंग विसरून आता भारतीय म्हणून जगण्याची वेळ आली आहे.

       या सगळ्या पासून आपल्या देशाला वाचवण्याची पुर्ण पणे आपली जबाबदारी आहे. आंघोळीचे साबण , कपडे धुण्याचे साबण, कपड्याची पावडर, tooth paste , शेविंग cream, कोल्ड्रिंक्स , वॉटर बॉटल , आणि सध्या मोठ्या प्रमाणात उपयोग होणारे सॅनिटायझर, या मूलभूत गोष्टीनं पासून आपण आपल्या जबाबदारीची सुरुवात केली तरी आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात हात भर लागेल.

   खरंतर..  स्व म्हणजे स्वतः च ...मग याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या शालेय पुस्तकांवर असणार title " my english book " अस असत. म्हणजे माझ इंग्रजी च पुस्तक. मग अस का? तर याच कारण खूप सोपं आहे. जेव्हा ते माझ होत तेव्हा ती गोष्ट खूप जिव्हाळ्याची वाटते. ती गोष्ट जपून वापरावी वाटते. त्या गोष्टी बद्दल एक वेगळच आदरयुक्त प्रेम असत. हेच आपण मुलांना लहान असल्या पासून शिकवतो. कारण मुलांना स्वतःच्या गोष्टी जबाबदारीने वापरण्याची सवय व्हावी म्हणून पण मोठे झाल्यावर आपण च कुठे तरी ते विसरतो का? 

आज आपल्याला त्याच लहान पणाच्या गोष्टी आठवायची गरज आहे. आज आपला भारत यशाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी किंव्हा आपली आर्थिक स्थिती टिकवण्यासाठी आपल्या त्याच लहानपणच्या गोष्टींचा संदर्भ घेण्याची आपली एक नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी आहे. आणि ती तुम्ही आम्ही कशी पाळावी या बाबत ही सांगण गरजेचं वाटत ...

ओळख स्वदेशी आणि विदेशी ची

मग जेव्हा मा . पंतप्रधानांचे भाषण ऐकले आणि त्यांनी जो स्वदेशीचा पुरस्कार करायचे आवाहन केले ते ऐकून स्मरण झाले . आपण आता फक्त एक केले पाहिजे . बऱ्याचदा आपल्याला स्वदेशी कंपनी कुठली , विदेशी कुठली हे लक्षात न आल्याने कोणताही माल आपण घेतो. एक साधी युक्ती आपण लक्षात ठेवूयात. आपल्या देशाचा बार कोड - 890 पासून सुरु होतो . आत्ता लगेच घरातले कोणतेही उत्पादन घ्या , साधा बिस्कीट पूडा सुद्धा ... बार कोड बघा 890 पासून सुरु झाला असेल . याचा अर्थ हा माल made in india आहे .

खऱ्या अर्थाने आता चीनचा बदला घेण्याची ही वेळ आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कुरापती करणे आणि पाकिस्तान ला कायम पाठीशी घालण्याचे कामच चीन करत आलाय. युनोच्या स्थायी सदस्यत्वाच्या यादीत भारताचा समावेश असायला कायम विरोध हा चीनचा होता. 1962 च्या युद्धात दगाबाजी करत चीन ने तर भारताच्या सीमेजवळील खूप मोठा भाग गिळंकृत केला आणि त्यासोबतच आपल्या सात बहिणी म्हणाल्या जाणाऱ्या राज्यावर देखील आजही अधिकार गाजवू पाहताय.

  आणि जरी उद्या आपल्यावर चीन ने कब्जा केला तर त्याला स्वतः आपण जबाबदार असणार. कारण इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी भारताला गुलाम बनवले तेव्हा आपण अनपढ होतो पण आज समजदार आहोत. त्यामुळे त्या गुलामगिरी मधे फसलो ..पण आज आपल्या कडे एक संधी आहे. स्वदेशी उत्पादन जास्तीत जास्त वापरा आणि जर १३० करोड भारतीयांनी ९० दिवस कोणतेच विदेशी उत्पादन खरेदी नाही केले तर भारत हा जगातील दुसरा अमीर देश बनेल. आणि आपले २ रुपये १ डॉलर बरोबर होतील. 

२०१९ च्या दिवाळी मधे एका आंदोलना मधे भारतीयांनी चिनी लाईट वर बहिष्कार टाकलं तेव्हा चीन चे २०% नुकसान झाले. त्या नुकसानीचे चीन हादरून गेला. तर १००% नुकसान झाले तर चीन परत अशी घटिया हरकत करणार नाही. भारतीय आहोत सिद्ध करून दाखवा एकजुटी मधे किती ताकद असते .

आत्मनिर्भर बनण्याची गरज ही फक्त इंडिया मध्ये राहणाऱ्यांना आहे कारण माझा गरीब भारत अगोदर पण कमी किंमतीत मिळणारी भारतीय वस्तूच वापरत होता. मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा विषय राहतो तर आजही एक पण अशी कंपनी नाहीये जी स्वतःहून पूर्णपणे आत्मनिर्भर पने भारतीय असेल! आपल्याकडे फोन बनवले जाताय पण त्यांचा कच्चा माल आपल्याला बाहेरून आणावा लागतोय. कोरोना सुरू झाल्यानंतर आपल्याकडे आत्मनिर्भर पणाने मास्क आणि सौरक्षक किट्स बनवल्या गेल्या त्याही पूर्ण पणे भारतीय! व्हेंटिलेटर सारखे अवघड व महाग उपकरण खूप लोकांनी कमीत कमी किंमतीत बनवले. म्हणजे आपण भारतीय गरजेच्या काळात कुठल्याही स्थराला जाऊन काम करुच शकतो हे नक्की. आपल्याकडे तेव्हडी क्षमता आहे पण ती आता बाहेर आली पाहिजे.
नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्ट करायची आणि डोकं चालवायची तयारी दाखवा. आपण कमी नाही पडणार हे मी विश्वासाने सांगू शकतो. 

त्या रकमेविषयी

आता प्रश्न आहे त्या रकमेचा!  मोदींनी 20 लाख करोड रुपये यासाठी राखीव ठेवले. आता हा निधी जनसामान्यांना मिळाला म्हणजे झाले नाहीतर नेहमी प्रमाणे भारतातील गरीब (अंबानी अदानी असेच बरेच) खूप गरीब आहेत म्हणून फक्त त्यांनाच मिळाला की वाटेल धन्य आहे मोदीजी तुमचं अभियान आणि तुमचे हे विचार! 

         शेवट करताना..सुरुवात केलेल्या गोष्टी पासून च करावा वाटतो ...
त्या फोटोमधल्या माणसाचा चेहरा दिसत नाहीये कारण तो तुमच्या माझ्यात दडलेला कुणीही असू शकतो , तेवढी ओल शाबूत ठेवली पाहिजे.
कोणतीही गोष्ट खरेदी करताना फक्त स्वतःच्या मातृभिमुशी प्रामाणिक रहा.
कारण प्रत्येक वाईट काळात आपली आईच निःस्वार्थी पणाने आपल्या पाठीशी असते.

Post a Comment

0 Comments