Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort

किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला)

शिवपट्टण म्हणलं की शिवा वर अतूट भक्ती असणाऱ्या सरदार निबाळकारांची आठवण होते. मराठयांच्या सर्वात शेवटच्या विजयाला विसरून कसे चालेल. 

किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort

अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखक आणि प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो.स.सरदेसाई यांच्या मराठी रियासात उत्तर विभाग भाग २ मध्ये लिहितात, "पानिपतच्या संहाराचा चटका महाराष्ट्राच्या अंतःकरणाला जितका ताजा आहे तितकाच खर्ड्याचा विजय मराठ्यांच्या बाहुला आजही स्फुरण चढवतो."


किल्ल्याचे नाव- किल्ले शिवपट्टण, खर्डा किल्ला अथवा खर्ड्याचा भुईकोट किल्ला
समुद्रसपाटीपासुन ऊंची-
किल्ल्याचा प्रकार- भुईकोट
चढाईची श्रेणी- सोपी
ठिकाण- जामखेड तालुक्यातील खर्डा गावात
जिल्हा- अहमदनगर
सध्याची अवस्था- व्यवस्थित (पण दुर्लक्षित)

किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort


किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

शिर्डी हैद्राबाद महामार्गालगत असणारे हे खर्डा गाव.गावाला मराठवाड्याच प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखलं जाते. पुण्यावरून बस ने जामखेडला (१६० कि. मी.) येऊ शकता अथवा अगोदर अहमदनगर ला येऊन मग तिथून जामखेड ला यावे लागेल. जामखेड वरून खर्डा गावाला जाणारी बस पकडायची , नाही मिळाली तर खाजगी गाडीच्या माध्यमातून जामखेड वरून २९ कि. मी. अंतरावर पोहोचायचे. नाशिक वरून आपल्याला अहमदनगर आणि मग जामखेड खर्डा असा प्रवास करावा लागेल.

भेटीची वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५


किल्ल्यावर प्रवेश करताना-

किल्ल्यावर अगोदरच सरकारच लक्ष नसल्याने थोडी ढासळलेली अवस्था आहे त्यामुळे आपण तिथे जाऊन वास्तुना नुकसान होईल असं करू नये.
किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort

बालाघाटच्या डोंगररांगेतील शहर म्हणजे शिवपट्टण अर्थात आजचे खर्डा शहर! गावाच्या दक्षिण बाजूला जी तटबंदी आहे तो म्हणजे किल्ले शिवपट्टण होय. किल्ल्यावर आपल्याला जास्त गोष्टी बघण्यासारख्या नाहीयेत पण शासनाने जर इतिहास निगडित संग्रहालय किंवा यासारख्या काही गोष्टी बनवल्या तर किल्ल्याचा आणि गावाचा नक्की विकास होईल. किल्ला तसा लोकांच्या नजरेआडचा त्यामुळे इथे जास्त गर्दी नसतेच.

किल्ल्याच्या भोवती खंदक खोदलेले आहे पण आता त्यातील बरेच ठिकाणी बुजलेल्या अवस्थेत ते आढळते. किल्ल्याला एकूण ४ मुख्य बुरुज आणि २ दुय्यम बुरुज आहेत. दरवाजाची रचना ही २ वेळेस ९० अंशाचा कोण घेत बनवलेली आहे म्हणजे हत्ती दरवाजा मोडू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. खूप साऱ्या भुईकोट किल्ल्यांवर ही अशी रचना आहे परंतु प्रत्येकाचे बांधकाम,रचना ही वेगवेगळी असते आणि इतिहास प्रेमींनी ती समजून घेतली पाहिजे. गडाच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख लिहिलेला आहे,उर्दू भाषेत असला तरी इतिहास जाणकारांनी त्यावरील मजकूर असा सांगितलाय की हा किल्ला सुलतान निंबाळकर यांनी १७४३ मध्ये बांधलेला आहे.
किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort


किल्ला उत्तराभिमुख असून आपल्याला महाराष्ट्र शासनाचे काही फलक दरवाजा शेजारी दिसतील. (किल्ला कधी कधी बंद असतो याच कारण मला देखील माहीत नाहीये) मध्ये गेल्यावर तटबंदीवरील नक्षीकाम आणि जंग्या बघायच्या. त्यानंतर मध्ये एक बारव लागते... प्रचंड खोल अशी ही बारव वरून देखील पाहू शकता किंवा तिच्या मध्ये जायला एक दगडी पायऱ्यांचा मार्ग लागतो त्याने देखील जाऊ शकता. त्यानंतर किल्ल्यावर एक जुनी मशीद आहे, पडक्या अवस्थेत असली तरी स्थापत्यशास्त्र बघण्यासारखं आहे. इथे किल्ल्याची सफर संपते परंतु ज्यांनी हा किल्ला ज्यांनी बांधला त्या निंबाळकरांची समाधी ओंकारेश्वराच्या मंदिराच्या परिसरात तुम्हि बघू शकता आणि ती १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा देखील करू शकता.


किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort


किल्ले शिवपट्टणचा इतिहास-

शिवपट्टण हे खर्डा गावाचे जुने नाव, कालांतराने गावाचे नाव बदलले पण किल्ला आजही त्या नावाने ओळखला जातो. किल्ल्याचे बांधकाम हे सरदार आप्पासाहेब निंबाळकरयांनी १७४३ मध्ये बांधला. निंबाळकर म्हणजे कट्टर शिवभक्त ....पंचक्रोशीत आज १२ ज्योतिर्लिंग आढळतात त्यांचे ते कट्टर भक्त. जवळपास ४० कि. मी.ची ही परिक्रमा देखील आपण करू शकता. असो, किल्ल्याच्या निर्मितीविषयी ही माहीत ठोक पणे सांगण्यामागचे कारण म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आढळणारा शिलालेख होय.

शिवपट्टण हे प्रसिद्ध आहे मराठ्यांच्या शेवटच्या मोठ्या विजयासाठी. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाई जणू हादरली होती. माधवरावांच्या नेतृत्वाखाली पेशवाई सुरू होती परंतु माधवराव जरी सत्त्येवर असले तरी नाना फडणीसांची चतुराई सर्व काही हाताळत होती. पेशव्यानकडे सर्व दक्षिण भारताचा जवळपास कारभार होता त्यामुळे राज्यांकडून वसुली कर ते गोळा करत आणि त्यात राज्यांमध्ये हैदराबादचा निजाम देखील होता. हैद्राबादच्या निजामकडे जवळपास २ कोटी रकमेची वसुली थकली होती.
किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort

निजामाच्या वकिलाने त्याला असा सल्ला दिला की या रकमेतून फौज उभी करावी आणि मराठ्यांना वसुली न देता त्यांच्याशी युद्ध करावे. निजामाला देखील ते पटले आणि त्याने थोड्याच दिवसात फौज उभी केली.निजामाने भर दरबारात मराठ्यांचा अपमान केला त्यामुळे मराठे देखील संतापले होते.निजाम पुण्याकडे कूच करू लागला. मराठ्यांना ही गोष्ट कळताच पेशवे आणि मराठे एकत्र आले आणि ३० नोव्हेंबर १७९४ ला मराठी फौजा शत्रूला तोंड द्यायला पुण्याच्या बाहेर पडल्या. रत्नापुर ला तळ टाकला गेला आणि मग कशा प्रकारे लढायचं याची तय्यारी सुरू झाली. मराठ्यांचा मुख्य लढाऊ तळ एक पाऊल पुढे घोडेगाव येथे पडला. मराठ्यांचा फौजेचे सेनापती होते परशुराम भाऊ पटवर्धन, त्यांच्या सोबतीला नाना फडणीस ची चतुराई, तोफखाना प्रमुख दौलतराव शिंदे , तुकोजी होळकर आणि दुसरे रघुजी भोसले हे शूर सरदार देखील होते.
किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort


मराठ्यांनी निजामावर हल्ला केला परंतु तेव्हा काही तुकड्या पोहोचू न शकल्याने निजाम बचावला. परंतु आता मराठ्यांचा सामना मोकळ्या मैदानात करणे शक्य नव्हते आणि परांड्याच्या किल्ल्यापर्यंत तर तो पोहोचू शकत नव्हता म्हणून त्याने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. परंतु अखेर ११ मार्च १९९५ ला लढाई सुरू झाली आणि मराठयानी विजयाचे पारडे आपल्या बाजूने झुकते ठेवले मग निजाम आणि मराठे तहाची बोलणी सुरू झाली. २७ मार्च ला अखेर निजामाचा सेनापती मशिरुल्मुक मराठ्यांच्या स्वाधीन झाला आणि युद्ध मराठे जिंकले. सर्वात मोठा आणि अखेरचा मराठ्यांचा हा विजय मराठा साम्राज्याचे वर्चस्व वाढवणाराचा होता.
किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort

किल्ले शिवपट्टण (खर्डा किल्ला/ खर्डा भुईकोट किल्ला) Shivpattan Fort


राहण्याची व जेवणाची सोय-

खर्डा हे शहर असल्याने येथे हॉटेल आणि राहण्याची व्यवस्था सहज होऊ शकते.

Post a Comment

0 Comments